दि. 28/02/2026 रोजी National Science Day चे औचित्य साधून प्रा. शा. शेंबोली, ता. मुदखेड येथे शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन उत्साहात भरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात थोर भारतीय शास्त्रज्ञ सी.व्ही.रमन यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. विज्ञान शिक्षिका सुनिता केंद्रे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर प्रदर्शनाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम दुबेवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी मंगला महाजन यांनी प्रास्ताविकातून विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले.
आपल्या मनोगतात त्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन म्हणजे कार्यकारणभाव तपासणे होय, असे सांगितले. प्रत्येक कार्यामागे कारण असते आणि त्या कारणांचा शोध घेण्याची पद्धत म्हणजे विज्ञान होय. निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि प्रयोग यांच्या माध्यमातून सत्य जाणून घेण्याचा सर्वात खात्रीचा मार्ग म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांमध्ये हा दृष्टिकोन रुजावा यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनात इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी विविध आकर्षक प्रयोग सादर केले. हायड्रॉलिक JCB, जहाज, कुलर, ज्वालामुखी, ‘पाणी अडवा पाणी जिरवा’, पाण्याची घनता, भूकंपरोधक घर, हवेचा दाब, सौरऊर्जा, पवनचक्की, जलशुद्धीकरण यांसारखे लहान-मोठे प्रयोग विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने मांडले. या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात शिक्षिका सुनिता केंद्रे यांनी मार्गदर्शन केले. प्रदर्शनास उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांनीही भेट देऊन प्रयोगांची माहिती जाणून घेतली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बळीराम दुबेवाड, तलाठी एस.एम.वच्छेवार,ग्रामसेवक प्रकाश पाटील,माजी मुख्याध्यापक लक्ष्मण शिंदे, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मुकीत सर, रहीम सर, पोलीस पाटील पांचाळ, मुख्याध्यापक चंपत मुनेश्वर, शिक्षक रामकृष्ण लोखंडे, मंगला महाजन, सुनिता केंद्रे, जयश्री गायकवाड, संगीता वादळे, गोविंद गोरेवाड तसेच गावकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन झाल्याबद्दल सर्व स्तरांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
1, रस्ते विना शेती नाही
हा संकल्प हाताशी धरून संपूर्ण गावाला जोडणारी रस्ते ग्रामीण मार्गाचा दर्जा देऊन जिल्हा मार्गाचा दर्जा देऊन संपूर्ण रस्ते चे डांबरीकरण करण्यात आले आहे त्याच्यामुळे शेतीची वही वाट करण्यासाठी शेतकऱ्यांचा हजारो पैसा वेळ वाचला रस्ते रुंदीकरण करते वेळेस परिसरातील शेतकऱ्यांनी करोडो रुपयाची शासनाची कोणतीही मोबदला न घेता जमीन दान दिली
2, शेंबोली जलसंधारण पॅटर्न
शेंबोली हे गाव सीता नदीच्या तीरावर बसले असून सीता नदीचे वेडे वाकडे व तसेच अरुंद पात्र असल्यामुळे पावसाचे पुराच्या पाण्यामुळे नदीच्या तीरावर शेतीचे अतोनात नुकसान व्हायचे व तसेच बारमाही पिके घेण्यात शेतकरी डजत नव्हते 2011 मध्ये लोकस सहभागातून तीन किलोमीटरचा टप्पा पार केला त्यावेळेस दुष्काळजन्य परिस्थिती गाव मधून नांदुरुस्त असलेले बंधारे याला लोकसभातुन जाड प्लास्टिक लावून माती लावून पाणी आडण्यात आले त्यामुळे मोठा जलसाठा निर्माण झाला व भूजल स्तर पाच किलोमीटर परिगा मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढला संपूर्ण 300 ते 400 विहीरी कोरड्या असलेल्या भर उन्हाळ्यामध्ये तुडुंब भरल्या हा महाराष्ट्र भूजल सर्वेक्षण चा रिपोर्ट आहे
3, महाराष्ट्रातील निसर्गरम्य पर्यटन क्षेत्र महाराष्ट्र सरकार मान्यता प्राप्त महाराष्ट्र मधली प्रथम पहिले श्री नर्मदेश्वर खंडोबा महादेव संस्थान मल्हार गड शेंबोली येथे
1 भव्य सभा मंडप मंगल कार्यालय डिस्ट्रीब्यूशन मॅरेज पर्यटन स्थळे लग्न लावण्यासाठी व्यवस्था
2, गोरक्षण
3 व्यायाम शाळा
4, मुलांना खेळण्यासाठी पार्क
5, वाचनालय
6, पर्यटकांसाठी व यात्रेसाठी निवासी वाजता
करण्याचे असे नियोजन आहे संकल्प आहे
4, रमाई आवास योजना महाराष्ट्र मधी एकमेव सुंदर घरकुल एखाद्या सुंदर शहराला लाजिरवा लाजिरवाणणारे घरकुल
5, दिव्य भव्य शासनाची कोणती मदत न घेता नोबुद्ध महिलानी 80 लक्ष्याचे लोकसभागामधून बुद्धविहाराचे काम पूर्णत्वाकडे
6, सुंदर पाणीपुरवठा योजना जलस्वराज टप्पा -2 संपूर्ण गावाला वाटर फिल्टर चे पाणी या योजनेला महाराष्ट्र मध्ये मुदतीच्या वेळेच्या आत प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल प्रथम पारितोषक महाराष्ट्रात नाही देशात नाही बाहेर देशाला सुद्धा याचे प्रेझेंटेशन गेले आहे याच्याबद्दल आम्हाला स्वार्थ अभिमान आहे
7, सुंदर आरोग्य उपकेंद्र इमारत मधुर च्या आत संपूर्ण इमारत केल्याबद्दल बहुमान
शेंबोली जलसंधारण पॅटर्न 2011 मध्ये लोकसहभा मधून तीन किलोमीटर सीता नदीचे खोलीकरण रुंदीकरण काम करण्यात आले जलयुक्त शिवार अभियान ला दिशा प्रकल्प ठरला